
सह्याद्री पर्वतरांगांतील वनसंपदा, वन्यजीवांचे अधिवास आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याबाबत महाराष्ट्र सरकारने संवेदनशील भूमिका घ्यावी, या मागणीसाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने ‘भीमाशंकर सत्याग्रह’ आंदोलन करण्यात आले. हुतात्मा स्मारक येथे करण्यात आलेल्या या आंदोलनात मंत्रिमंडळाच्या प्रतीकात्मक दगडांना शेंदूर लावून त्यावर गोमूत्र शिंपडण्यात आले. आंदोलकांनी मंत्रिमंडळाला ‘जंगलमारी कॅबिनेट’ आणि ‘दगडभेजा मंत्रिमंडळ’ जाहीर करत शासनाच्या कथित पर्यावरणविरोधी भूमिकेचा निषेध केला.


























































