देवगड बंदरात खलाशाचा नौकेवरून पडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नौकेवरून तोल जावून पाण्यात पडल्याने देवगड बंदरातील नौका म्हाळसा मल्हार या नौकेवरील खलाशी विशाल विष्णू गुरव ( वय 31, रा.पाटगाव वरची गुरववाडी) याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. या खलाशाचा मृतदेह रविवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास देवगड खाडीत सापडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार देवगड किल्ला येथील अक्षय संजय हरम यांच्या म्हाळसा मल्हार या नौकेवरील खलाशी विशाल विष्णू गुरव हा खलाशी 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नौका देवगड बंदरात उभी असताना नौकेवरून तोल जावून पाण्यात पडला. शोधाशोध करून तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह देवगड खाडीत सापडला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून तपास पो.हे.कॉ.राजन जाधव करीत आहेत.