
वांद्रय़ाच्या सेंट अॅनीस शाळेने प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवात तिरंदाजी स्पर्धेत कमालच केली. एपंदर 27 स्पर्धांपैकी 18 स्पर्धांत त्यांच्या विद्यार्थ्यांनी सोनेरी यश संपादले आणि त्यांनी सर्वाधिक 141 गुणांसह निर्विवादपणे तिरंदाजी स्पर्धेत सांघिक विजेतेपदावर आपल्या नावाचे शिक्कामोर्तब केले. दुसऱया क्रमांकावर असलेल्या यशोधाम शाळेला 8 सुवर्णपदकांमुळे 60 गुण मिळाले. त्यांना सांघिक उपविजेतेपद मिळाले तर श्री श्री रविशंकर विद्यामंदिरला तिसऱया क्रमांकावर राहावे लागले. या शाळेला केवळ एकच सुवर्ण मिळविता आले.
प्रबोधन आंतरशालेय तिरंदाजी स्पर्धेचा निकाल
इंडियन राऊंड-15 मी. (12 वर्षांखालील मुले) 1. रियान पाटील (पारिख इंटर), 2. रुद्र मालाडकर (श्री श्री रविशंकर), 3. विहान शाह (जानकीदेवी) इंडियन राऊंड– 15 मी. (12 वर्षांखालील मुली ) 1. आर्या टेमकर (श्री श्री रविशंकर), 2. रिवा शिंदे (सेंट अॅनीस) 3. अतिफा मनियार (सेंट अॅनीस). z इंडियन राऊंड – 20 मी. (12 वर्षांखालील मुले) 1. रियान पाटील (पारिख इंटर.), 2. रुद्र मालाडकर (श्री श्री रविशंकर), 3. विहान शाह (जानकीदेवी) इंडियन राऊंड– 20 मी. (12 वर्षांखालील मुली) 1. रिवा शिंदे (सेंट अॅनीस), 2. आर्या टेमकर (श्री श्री रविशंकर), 3. अतिफा मनियार (सेंट अॅनीस). z इंडियन राऊंड– 30 मी. (14 वर्षांखालील मुले) 1. ध्रुव पायरे (श्री श्री रविशंकर), 2. रियांश ठाकूर ( स्वामी विवेकानंद), 3. तिमीज मौर्या (श्री श्री रविशंकर) z इंडियन राऊंड– 30 मी. (17 वर्षांखालील मुली) 1. श्रुती यादव (सेंट अॅनीस), 2. अलिनाह पटेल (सेंट अॅनीस).




























































