
सामना ऑनलाईन । पणजी
देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेले गोव्यामधील सांगेतील साळावली धरणाचा जलाशय भरून वाहू लागला आहे. धरण ओव्हर फ्लो होण्याची पर्यटक आतूरतेने वाट बघत असतात. बुधवारी रात्री 10.20 वाजता धरण भरुन वाहू लागले. घरणातून होणाऱ्या ओव्हरफोचे मनमोहक दृष्य पाहण्यासाठी साळावली धरणाकडे आता पर्यटकांची गर्दी होणार आहे.
साळावली धरण दक्षिण गोव्यासाठी वरदान आहे. तसेच याधरणाचे पर्यटकांनाही आकर्षण आहे. या धरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे धरण भरल्यावर मनमोहक दृश्य दिसते. ते बघण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. यंदा धरणाच्या जलाशयातील पाण्याची पातळी घटल्याने तसेच पावसाने उशिरा हजेरी लावल्याने गतवर्षाच्या तुलनेत धरण भरण्यास सहा दिवस जास्त लागले. गेल्या वर्षी जलाशयाचे पाणी 41.15 मीटर उंचीवरून 11 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता कोसळण्यास सुरुवात झाली होती. तर यावर्षी 17 जुलैला रात्री 10.20 वाजता पाणी कोसळू लागले.























































