सलमान खानचा ‘टायगर 3’ ची कथा लीक? वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेता सलमान खान त्याच्या सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेत असतो. चाहत्यांना आता भाईजानच्या ‘टायगर 3’ ची उत्सुकता लागली असून मोस्ट अवेटेड सिनेमांपैकी सलमानचा हा एक सिनेमा आहे. हा सिनेमा दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. मात्र या सिनेमात नेमके काय असणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. अशावेळी सर्व काही गुलदस्त्यातच असताना सलामानचा ‘टायगर 3’ सिनेमा लीक झाल्याची बातमी समोर येत आहे.

आयएमडीबीच्या वृत्तानुसार, ‘एक था टायगर’मध्ये कतरिना कैफने झोया या आयएसआयच्या गुप्तहेराचे पात्र साकारले आहे. टायगर आणि झोया एका नव्या मिशनवर जाण्यापूर्वी तिच्या जुन्या शत्रूंचाही शोध घेणार. झोयाचा हा शत्रू टायगर तिच्या आयुष्यात येण्यापूर्वीचा आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही, सिनेमात इमरान हाश्मी मोठा शत्रू म्हणून सर्वांसमोर दिसणार आहे. अशा परिस्थितीत टायगर आणि झोया सिनेमात जो शत्रू शोधत असतील तो दुसरा कोणी नसून इमरान हाश्मी असू शकतो, असे मानले जात आहे. ट्रेड अॅनालिस्ट मनोबाला विजयबालन यांनी देखील शेअर केले आहे की, सलमान खानच्या सिनेमाचा शेवट देखील खूप वेगळा असणार आहे. सिनेमाचा शेवट व्हायआरएफ युनिव्हर्सच्या भविष्यातील प्रकल्पाशी जोडला जाईल. तसेच सलमान खानचा ‘टायगर 3’ क्लिफहॅंगर संपूर्ण व्हायआरएफ स्पाय युनिव्हर्ससाठी ट्रेण्ड सेट करेल.

सलमान खान आणि वायआरएफच्या मोठ्या प्रोजेक्टचा शाहरूख खानही महत्वाचा भाग असणार आहे. शाहरूख याचा छोटा मात्र महत्वाचा या सिनेमात कॅमियो असणार आहे. त्य़ामुळे सलमान आणि शाहरूखला एकत्र पडद्यावर पाहायला मजा येणार आहे. शूटींगबाबत बोलायचे झाले तर, सलमान आणि त्याच्या टीमने सिनेमाचे पहिले शूटींग शेड्युल पूर्ण केले आहे. तर मागच्या दिवसात सिनेमाच्या सेटवरील फोटो व्हायरल झाले होते.