राम मंदिराला पाठिंबा देणाऱ्या मुस्लीम अभ्यासकाला धक्काबुक्की

1776

अयोध्येतील राम मंदिराला पाठिंबा देणाऱ्या एका मुस्लीम अभ्यासकाला काही मुस्लीम तरुणांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आहे. सलमान नादवी असे त्या मुस्लीम अभ्यासकाचे नाव असून ते ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे माजी सदस्य आहेत.

सलमान नादवी यांना लखनौमधील इस्लामिक सेमिनरी नदवाटूनल उलेमातील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी धक्काबुक्की केली आहे. नादवी हे त्या सेमिनरीच्या बोर्ड मिटींगमध्ये सहभागी व्हायला गेलेले असताना हा प्रकार घडला.

सलमान नादवी यांनी गेल्या वर्षी राम मंदिराला पाठिंबा देत मशिद दुसऱ्या ठिकाणी बांधावी असे मत व्यक्त केले होते. तसेच त्यांनी या प्रकरणात शांतीपूर्वक तोडगा काढावा अशी मागणी देखील केलेली. मात्र त्यानंतर नादवी यांना ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्यपदावरून काढून टाकण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या