
सामना ऑनलाईन । अमृतसर
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील प्रवाशांची ने-आण करणारी समझौता एक्सप्रेस अखेर पुन्हा एकदा धावू लागली आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांवर हिंदुस्थानने हवाई हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पाकिस्तानकडून समझौता एक्सप्रेस रद्द करण्यात आली. त्यानंतर हिंदुस्थानने देखील पाकिस्तानात जाणारी समझौता एक्सप्रेस रद्द केली होती.
दिल्ली येथून रविवारी निघालेली ही हिंदुस्थान-पाकिस्तानमधील समझौता लिंक एक्सप्रेस अटारी येथे पोहोचली. दरम्यान, हवाई हल्ल्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात आली होती. यावेळी हिंदुस्थानात अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना अन्न-पाणी आणि निवाऱ्याची संपूर्ण सोय हिंदुस्थानकडून करण्यात आली होती.
Punjab: Samjhauta Link Express has arrived at Attari. The train left from Old Delhi railway station yesterday as normal service resumed. The train had been suspended by both India and Pakistan after IAF strike in Pakistan. pic.twitter.com/tXyi3kJHKr
— ANI (@ANI) March 4, 2019




























































