सॅमसंगचा Galaxy M51 स्मार्टफोन लॉन्च, एकदा चार्ज केल्यावर 64 तास चालणार; जाणून घ्या फीचर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सॅमसंग कंपनीने आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन Galaxy M51 हिंदुस्थानमध्ये लॉन्च केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप बाबत अनेक दावे केले आहेत. स्मार्टफोनला 7,000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली असून यात रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट सिस्टीम देनुत्त आली आहे. यासोबतच टाइप सी ते टाइप सी केबल देण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यावर सलग 64 तास फोन वापरता येणार असून इंटरनेट सुरू असल्यास सलग 24 तास हा फोन सुरू राहील असा दावा कंपनीने केला आहे.

Galaxy M51 स्मार्टफोन काळा आणि निळा अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. स्मार्टफोनला 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

screenshot_2020-09-10-15-52-29-536_com-miui-gallery_copy_700x450

सोबतच फोनला चार रियर कॅमेरे देण्यात आले आहे. प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल, 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेन्स, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसिंग कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

images-2

ग्राफिक्ससाठी यात Adreno 618GPU सिस्टीम देण्यात आली असून Qualcomm Snapdragon 730G प्रोसेसर आहे. संमसंगचा हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे. 6GB आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 24 हजार 999 रुपये तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 26 हजार 999 रुपये असणार आहे.मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येईल.

samsung-galaxy-m51

अमेझॉनसह सॅमसंगच्या वेबसाईटवर 18 सप्टेंबर पासून याची खरेदी करू शकता. फायद्याची गोष्ट म्हणजे HDFC कार्ड यूजरला 2000 रुपयांपर्यंत सूटही मिळणार आहे.