
दक्षिण कोरियन कंपनीने दिवाळी आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ‘फेस्टिव्ह सिझन’ची घोषणा केली असून Reward Yourself प्रोग्राम लॉन्च केला आहे. या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि स्मार्टफोनवर बंपर सूट मिळत आहे. एचडीएफसी, एसबीआय डेबिट आणि क्रेडिट कार्ड धारकांना स्मार्टफोन, वेअरबेल आणि टॅब्लेटसवर फ्लॅट 10 टक्के सूट मिळू शकते. तसेच सॅमसंगच्या गॅलेक्सी स्मार्टफोनवर देखील डिस्काउंट मिळवू शकता.
कंपनीने वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, 4,999 ते 1,04,999 रुपयांपर्यंतच्या स्मार्टफोन, टॅब्लेटस आणि वेअरबेलची एचडीएफसी कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक दिला जाईल. ही ऑफर 15 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान लागू असणार आहे.
तसेच 4,999 ते 47,999 रुपयांपर्यंतच्या गॅलेक्सी स्मार्टफोनची एसबीआय कार्डद्वारे शॉपिंग केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळेल आणि ही ऑफर 28 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान लागू असणार आहे. यासह Galaxy Note 20 च्या खरेदीवर 10 हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जाईल. ही ऑफर 16 ऑक्टोबरला सुरू होणार असून 25 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे.
स्मार्टफोनसह Galaxy Smartwatch च्या खरेदीवर 3,990 रुपये किंमत असणारा Galaxy Buds+ फ्री मिळणार आहे. 15 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान या ऑफरचा तुम्ही लाभ घेऊ शकता.



























































