सॅमसंगकडून अल्‍ट्रा-पोर्टेबल प्रोजेक्‍टर लाँच; आता चालता-फिरता घ्‍या मनोरंजनाचा आनंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
samsung-ultra-portable-projector

सॅमसंग या मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने आज स्‍मार्ट स्‍पीकर आणि अॅम्बियण्‍ट लायटिंग डिवाईस असलेला नवीन, वजनाने हलका पोर्टेबल डिवाईस ‘दि फ्रिस्‍टाइल’च्‍या लाँचची घोषणा केली. ऑन-दि-गो जनरेशन झेड व मिलेनियल ग्राहकांवर लक्ष्‍य असलेल्‍या दि फ्रिस्‍टाइलमध्‍ये अद्वितीय तंत्रज्ञान व स्थिरता आहे, जो चालता-फिरता व्हिडिओ व ऑडिओ कन्‍टेन्‍टचा शोध घेणा-या ग्राहकांना सानुकूल व्‍युईंग व मनोरंजनाचा आनंद देतो. दि फ्रिस्‍टाइल जवळपास 100 इंच (2 मी 54 सेमी) स्क्रीन आकारापर्यंत व्हिडिओ प्रोजेक्‍ट करू शकतो.

दि फ्रिस्‍टाइल हा अल्‍ट्रापोर्टेबल प्रोजेक्‍टर 84,990 रूपये या स्‍पेशल किंमतीमध्‍ये सॅमसंगचे ऑफिशियल ऑनलाइन स्‍टोअर सॅमसंग शॉप व अॅमेझॉनवर उपलब्‍ध असेल. ग्राहक 5,000 रूपयांच्‍या त्‍वरित कॅशबॅकचा देखील लाभ घेऊ शकतात. लिमिटेड पिरियड ऑफर म्‍हणून 29 मार्च 2022 रोजी सांयकाळी 6 ते 31 मार्च 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत दि फ्रिस्‍टाइल खरेदी करणा-या ग्राहकांना दि फ्रिस्‍टाइलसाठी 5,900 रूपयांचे कॅरी केस मोफत मिळेल. दि फ्रिस्‍टाइल प्री-बुकिंग करणा-या ग्राहकांना 4,000 रूपयांची सूट मिळू शकते.

पारंपारिक, बॉक्‍सयुक्‍त प्रोजेक्‍टर्सच्‍या तुलनेत दि फ्रिस्‍टाइलचे वैविध्‍यपूर्ण क्रॅडल काही सुलभ क्लिक्‍समध्‍ये जवळपास 180 अंशापर्यंतच्‍या रोटेशनसह भिंतीपासून सिलिंगपर्यंत परिपूर्ण व्‍युईंग अँगल देते. फक्‍त 0.8 किग्रॅ वजन असलेला हा प्रोजेक्‍टर युजर्सना टेबल्‍स, मजले, भिंती किंवा सिलिंग्‍सवर कुठेही हाय-क्‍वॉलिटी व्हिडिओ दाखवतो. यासाठी वेगळ्या स्क्रीनची गरज भासत नाही, फक्‍त तुम्‍हाला टिल्‍ट अप करण्‍याची गरज आहे आणि कुठेही, कधीही मोठ्या स्क्रीनवर मनोरंजनाचा आणि गेम्‍स खेळण्‍याच्‍या अनोख्‍या पद्धतीचा आनंद घ्‍या.

दि फ्रिस्‍टाइलमध्‍ये ऑटो कीस्‍टोन, ऑटो लेव्‍हलिंग आणि ऑटो फोकस वैशिष्‍ट्ये आहेत, जी उल्‍लेखनीय पिक्‍चर क्‍वॉलिटी देतात. ऑटो कीस्‍टोन डिवाईसला कोणत्‍याही कोनामधून कोणत्‍याही सपाट पृष्‍ठभागावर स्क्रीन आपोआपपणे समायोजित करण्‍याची सुविधा देते, ज्‍यामुळे प्रत्‍येक वेळी योग्‍य प्रमाणात चित्रे पाहायला मिळतात. ऑटो फोकस दि फ्रिस्‍टाइलला सेकंदांमध्‍ये जवळपास 100 इंच (2मी 54 सेमी) आकाराच्‍या स्क्रीनवर शार्प, सुस्‍पष्‍ट चित्रांसाठी आपोआपपणे फोकस करण्‍याची सुविधा देते. ऑटो लेव्‍हलिंग वैशिष्‍ट्य खात्री घेते की, स्क्रीनचा आकार खडकाळ मैदाने, मऊ पलंगांवर समप्रमाणात राहिल. व्‍युईंग अनुभव वाढवण्‍यासाठी दि फ्रिस्‍टाइल भिंतीच्‍या रंगानुसार प्रोजेक्‍शन सानुकूल करते, ज्‍यामधून सफेद रंगाच्‍या बॅकग्राऊण्‍डची गरज भासत नाही.

”दि फ्रिस्‍टाइलसह आमची क्षेत्राच्‍या मर्यादांच्‍या पलीकडे जात कुठेही, कधीही वैविध्‍यपूर्ण पसंती व जीवनशैली गरजांची पूर्तता करणारा युजर अनुभव देण्‍याची इच्‍छा आहे; यामधील अद्वितीय फॉर्म फॅक्‍टर तुमच्‍या गेम खेळण्‍याच्‍या व मनोरंजनाचा आनंद घेण्‍याच्‍या पद्धतीमध्‍ये बदल करेल. आम्‍हाला विश्‍वास आहे की, दि फ्रिस्‍टाइल ग्राहकांना नवीन स्‍तरीय मनोरंजनाचा आनंद देईल,” असे सॅमसंग इंडियाचे ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स व्‍यवसायाचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष मोहनदीप सिंग म्‍हणाले.
ग्राहकांना अविरत कन्‍टेन्‍ट पर्याय देण्‍यासाठी दि फ्रिस्‍टाइल हा क्षेत्रातील पहिला पोर्टेबल प्रोजेक्‍टर आहे, ज्‍यामध्‍ये प्रमाणित ओटीटी व्‍यासपीठ आहेत. ग्राहक सॅमसंग स्‍मार्ट टीव्‍हींमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या स्‍मार्ट वैशिष्‍ट्यांसह बिल्‍ट-इन स्ट्रिमिंग सेवा आणि अँड्रॉईड व आयओएस मोबाइल डिवाईसेसशी सुसंगत असलेल्‍या मोबाइल मिररिंग व कास्टिंग वैशिष्‍ट्यांचा आनंद घेऊ शकतात. जलदपणे चार्जिंगसठी दि फ्रिस्‍टाइलमध्‍ये सी-टाइप पॉवर कनेक्‍शन आहे.

गॅलॅक्‍सी युजर्ससाठी दि फ्रिस्‍टाइलमध्‍ये एक बटन आहे, जे गॅलॅक्‍सी डिवाईसेसशी संलग्‍न होते. बटन दाबताच युजर्स त्‍वरित त्‍यांच्‍या गॅलॅक्‍सी डिवाईसला रिमोट कंट्रोल म्‍हणून वापरू शकतात. कोणतेही वाय-फाय नेटवर्क्‍स उपलब्‍ध नसताना ते मोबाइल हॉटस्‍पॉट्सचा वापर करू शकतात.

दि फ्रिस्‍टाइलमध्‍ये ओम्‍नी-डायरेक्‍शनल 360-डिग्री साऊंडसह शक्तिशाली बिल्‍ट-इन स्‍पीकर आहे, जो ग्राहकांना कुठेही सिनेमा-क्‍वॉलिटी साऊंडचा अनुभव देतो. प्रोजेक्‍टर म्‍हणून वापर होत नसताना दि फ्रिस्‍टाइल अॅम्बियण्‍ट मोड, अर्धपारदर्शक लेन्‍स कॅपसह प्रि‍झम लायटिंग इफेक्‍ट, नयनरम्‍य दृश्‍ये किंवा तुमच्‍या स्‍वत:च्‍या फोटोसह जागेला आकर्षित करतो.

दि फ्रिस्‍टाइलमध्‍ये क्षेत्रातील पहिले फार-फिल्‍ड वॉईस कंट्रोल तंत्रज्ञान देखील आहे. ज्‍यामुळे स्क्रीन चालू करताच युजर्स त्‍यांच्‍या आवाजाच्‍या माध्‍यमातून कन्‍टेन्‍टचा शोध घेऊ शकतात. स्क्रीन बंद होताच ते संगीत ऐकण्‍याचा आनंद घेण्‍यासाठी डिवाईसचा वापर करू शकतात किंवा स्‍मार्ट स्‍पीकरप्रमाणे दिवसाच्‍या हवामानाबाबत माहिती विचारू शकतात.

किंमत, ऑफर्स आणि खरेदीचे स्‍थळ

दि फ्रिस्‍टाइल 84,990 रूपये या स्‍पेशल किंमतीमध्‍ये लाँच करण्‍यात आला आहे आणि सॅमसंगचे ऑफिशियल ऑनलाइन स्‍टोअर सॅमसंग शॉप व अॅमेझॉनवर उपलब्‍ध आहे. ग्राहक 5000 रूपयांच्‍या त्‍वरित कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात.

29 मार्च 2022 रोजी सायंकाळी 6 वाजल्‍यापासून 31 मार्च 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत दि फ्रिस्‍टाइल प्रोजेक्‍टर खरेदी करणा-या ग्राहकांना दि फ्रिस्‍टाइलसाठी मिळणार 5,900 रूपये किंमतीची कॅरी केस मोफत मिळेल. दि फ्रिस्‍टाइल प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 4,000 रूपयांची सूट मिळू शकते.

वॉरंटी

ग्राहकांना दि फ्रिस्‍टाइलवर 2 वर्षांची वॉरंटी मिळेल.