संगमेश्वर – मुंबई गोवा महामार्गावरील सोनवी आणि शास्त्री पूल खड्ड्यांच्या विळख्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी आणि शास्त्री पूल खड्डयाच्या विळख्यात सापडले असून खड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शास्त्री पूलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी या पुलावरून गाडी चालवताना वाहन चालकांना विशेष करुन दुचाकी स्वारांना हे खड्डे धोकादायक ठरत आहेत.हायवे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. या खड्डयांमुळे अपघात झाल्यास व अपघातात जीव गमावल्यावर संबंधित विभागाला जाग येईल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरुन नेहमी वाहनांची वर्दळ असते. संगमेश्वर शहर जवळचा सोनवी पूल आणि शास्त्री पूलावरून नेहमीच वर्दळ असते. दरवर्षी या पुलांची डागडुजी होते मात्र यावर्षी काहीच डागडुजी झालेली नसल्याने या पूल धोकादायक बनला आहे.त्यामुळे या पुलावरील खड्ड्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे