सांगलीत 12 कोरोनाग्रस्त आढळले, एकूण आकडा 140 वर

312

सांगली जिल्ह्यात आज बारा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यात सांगली आणि मिरज शहरातील रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात आता एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 140 झाली आहे.

कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या सांगली जिल्ह्यात अलीकडच्या काही काळात रोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. या पॉझिटिव्ह व्यक्तीचे मुंबई कनेक्शन असल्याचे स्पष्ट होत आहे. सांगली शहरातील वारणाली परिसरात 64 वर्षे महिलेने खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झालं. जिल्हा प्रशासनाने तातडीने त्या महिलेसह तिच्या नातेवाईकांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

सांगली जिल्ह्यात आज नव्याने 12 रुग्ण कोरोनाग्रस्त बाधितापैकी आटपाडी , खानापूर, कवठेमंकाळ, शिराळा या चार तालुक्यात प्रत्येकी दोन तर तासगाव ,सांगलीशहर, मिरज आणि जत तालुक्यात प्रत्येकी एक असे 12 कोरोना पॉझिटिव्ह सापडले या सर्वांवर मिरजेच्या शासकी covid-19 या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी दिली.

सांगलीच्या वारणाली परिसरातील कोरोना बाधित महिला बाहेरगावी गेलेली नाही अथवा बाहेर गावाहून आलेली व्यक्ती तिच्या संपर्कात आलेली नाही , त्यामुळे प्रशासनही बुचकळ्यात पडले असून नातेवाईकांकडून माहिती व चाचपणी करण्याचे काम सुरू आहे.

सांगली जिल्ह्यात आज अखेर एकूण 140 कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे यापैकी ७८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर चार जणांचा मृत्यू झाला आहे, सध्या 57 रुग्णावर मिरजेच्या शासकीय covid-19 रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या