सांगलीत 93 गावांचे पाणी दूषित, जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून रेड अलर्ट जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली जिह्यातील 93 गावांचे पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. या गावांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने रेड अलर्ट जाहीर केला असून, पाणी शुद्धीकरणानंतरच पिण्यास वापरण्यास सूचना करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने जिह्यातील सर्व गावांतील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जातात. त्यानुसार जानेवारीमध्ये एक हजार 370 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पैकी 93 गावांतील पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. या गावांना आरोग्य विभागाने रेड अलर्ट दाखवित पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा वापरूनच पाणी पिण्यास वापरावे, अशा सूचना दिल्या आहेत.

दूषित गावांमध्ये आटपाडीतील कुरूंदवाडी, निंबवडे, वाक्षेवाडी, विठलापूर, मापटेमळा, पुजारवाडी, चिंचाळे, औटेवाडी. जतमधील वायफळ, तिपेहळ्ळी, जिरग्याळ, डफळापूर, मोटेवाडी, पांडोझरी, संख, रेवनाळ, कंठी. मिरजमधील बेडग, तानंग, खोतवाडी, शिपूर, बेळंखी, सलगरे. तासगावमधील जरंडी, दहिवडी, तुरची. पलूसमधील वसगडे, आमणापूर. ईश्वरपूरमधील ओझर्डे, नायकलवाडी, ताकारी, मसुचीवाडी, कामेरी. शिराळ्यातील चरण, शिरसाटवाडी, मांगले, देववाडी, जांभळेवाडी, कांदे, मारेवाडी, कोकरूड, माळेवाडी. खानापूरमधील लेंगरे, मादळमुठी, घानवट, आळसंद, करंजे, हिवरे, मोही, शेंडगेवाडी, जाधववाडी, खानापूर, पळशी, घोटीखुर्द, रेवणगाव. तर कडेगावमधील शाळगाव, बोंबेवाडी, देवराष्ट्रे, शिरसगाव, कोतवडे, हिंगणगावखुर्द, सहोली आदी गावांचा समावेश आहे.