शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा सांगली जिल्ह्यात झंझावात

सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात संपूर्ण जिल्हाभर सुरू झाला असून, सर्व ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी फक्ऩत ‘चंद्रहार’ असा निर्धार मतदारांतून व्यक्ऩत केला जात आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात यावेळी तब्बल वीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी पहिल्या दिवसांपासून प्रचारात गती घेतली आहे. भाजपाचे उमेदवार खासदार संजय पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील, ओबीसी राष्ट्रीय आघाडीचे अपक्ष उमेदवार प्रकाश शेंडगे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे अशी लढत होत असली तरी, खरा सामना भाजपचे उमेदवार संजय पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्यातच होत आहे.

प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी गती घेतली असून, मतदारसंघात ठिकठिकाणी त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धडाका उडवला आहे. गावोगावी बैठका होत आहेत. मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गावोगावी प्रचारफेऱया निघत आहेत. पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात संपूर्ण मतदारसंघात सुरू आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात पैलवान चंद्रहार पाटील यांनी इतर उमेदवारांपेक्षा आघाडी घेतली आहे. त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता यावेळी चंद्रहार पाटील सांगली लोकसभेचे मैदान मारणार अशीच चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 2 मे रोजी सांगली येथे जाहीर सभा होणार आहे. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचा 4 मे रोजी सांगलीमध्ये रोड शो आणि विटा येथे जाहीर सभा आयोजित केल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी दिली आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह प्रमुख नेते मंडळी, तसेच काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी सांगलीत येणार आहेत. आतापर्यंतच्या प्रचारात महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी आघाडी घेतली आहे.

विशाल पाटील यांनी जनतेची दिशाभूल करू नये

n अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी स्वतःला खरा पैलवान म्हणणे म्हणजे आम्हा पैलवानांना चेष्टा वाटायला लागली आहे. सांगलीत खरी कुस्ती ही भाजपचे संजय पाटील आणि माझ्यातच आहे. उगाच सहानभूतीच्या नावाखाली विशाल पाटील यांनी सांगलीकरांची दिशाभूल करू नये, असा हल्लाबोल करीत चंद्रहार पाटील म्हणाले, ‘सांगली जिह्यातील जनता भाजपला कंटाळली आहे. तेच ते वादे, तीच ती आश्वासने आणि त्याच त्या खासदाराचा चेहरा बघून लोक वैतागले आहेत. त्यामुळे या वेळी सांगली जिह्यात परिवर्तनाची लाट आहे,’ असे ते म्हणाले.