जनतेचा विश्वासघात करणाऱ्या मोदी सरकारला उखडून टाका – अनिल कोकिळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सन 2014 पासून केंद्रात सत्तेकर असलेल्या भाजपच्या मोदी सरकारने सर्व स्तरावर जनतेचा विश्वासघात केला आहे. जनतेला आश्वासनांचे गाजर दाखविणाऱ्या मोदी सरकारला येत्या निवडणुकीत उखडून टाका, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकिळ यांनी केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यभर ‘होऊ द्या चर्चा’ अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून भाजप सरकारच्या फसव्या योजना आणि आश्वासनांचा भंडाफोड करण्यात येत आहे.

सोलापूर शहरातील शहर उत्तर व शहर मध्य विधानसभा मतदारसंघात अभियानाचे श्री दत्तनगर चौक येथे संपर्कप्रमुख अनिल कोकिळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास महिला आघाडी जिल्हा संघटिका अस्मिता गायकवाड, शहरप्रमुख विष्णू कारमपुरी, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दत्तात्रय काणकर, माजी जिल्हाप्रमुख अजय दासरी, संघटक अतुल भवर, विभागीय संघटक महेश धाराशिवकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मोदी सरकारच्या निक्रिय आणि जुमले कारभारावर जोरदार टीका केली.

उपशहरप्रमुख अनिल दंडगुले, अनिल कोंढुर, चंद्रकांत मानकी, सुरेश जगताप, यल्लाप्पा मिठ्ठा, महानंदा सावंत, युवतीसेनेच्या पूजा खंदारे, रेखा आडवी, सौरम्मा खंदारे, शिवा ढोकळे, संदीप बेळमकर, शिवाजी कोळी, अमित भोसले, तुषार खंदारे, धनराज जानकर, महेश ठाकरे, रेवण पुराणिक, बालाजी विठ्ठलकर, नाना मोरे, विवेकानंद कनकुरे, रेकण बुक्कानुरे, संजय गकळी, किठ्ठल कुऱहाडकर यांच्यासह शिवसैनिक आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.