सांगली- दोन वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण, जिल्ह्यात 25 जण कोरोनाबाधित

780

आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सांगली जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 25 झाली आहे. ही व्यक्ती सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित कुटुंबाशी संबंधित असून या व्यक्तिला जिल्ह्यातील सिव्हील हॉस्पिटलच्या आयसोलेशन कक्षात आहे. हा कोरोनाबाधित रुग्ण अवघ्या दोन वर्षांचा आहे, अशी माहिती मिळत आहे.

NIV कडून प्राप्त झालेल्या अहवालापैकी एका रुग्णाचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर उर्वरित दोघांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. ज्या व्यक्तीचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे, तो रुग्ण मिरज येथे आयसोलेशन कक्षामध्ये असून जिल्ह्यातील ज्या कुटुंबातील रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्याशी संबंधित आहे. या रुग्णाचं वय अवघं दोन वर्षं आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या