संगमेश्वर बाजारपेठेत लॉक डाऊनची ऐशीतैशी; खरेदीसाठी गर्दी, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनाचाही समावेश

566

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज लॉकडाऊनचा आठवा दिवस असून उगाचच रस्त्यावर फिरणाऱ्या वाहने आणि नागरिकांवर कारवाईचा बडगा उभारण्यात येत आहे. लॉक डाऊन असतानाही संगमेश्वरात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. यामध्ये सोशल डिस्टन्सिगचे कोणतेही नियम पाळण्यात येत नव्हते.

बुधवार हा संगमेश्वरचा आठवडा बाजाराचा असतो. मात्र कोरोनामुळे दोन आठवडे बाजार रद्द करण्यात आला होता. मात्र आज तिसऱ्या आठवड्याच्या दिवशी अचानक खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली. यामध्ये दुचाकी आणि चार चाकी गाड्याच जास्त होती. तर रिक्षाचाही त्यामध्ये समावेश होता. दुचाकी आणि चार चाकी वाहतूकीवर कडक निर्बंध लादावेत अशी मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या