
>> संजय कऱ्हाडे
एक शर्मा त्या दिवशी खेळला. एक शर्मा परवा खेळला. एक शर्मा धावांसाठी कासावीस दिसला. एक शर्मा आततायी दिसला. दोन्ही शर्मा हेझलवूडला सरसावलेले दिसले. त्या प्रयत्नात हुकलेले दिसले. एक शर्मा चुकीतून शिकला. नाबाद शतक झळकावून परतला. एक शर्मा बुद्धू ठरला. एलिसच्या संथगतीने टाकलेल्या चेंडूवर फसला. एका शर्माने अपेक्षा पूर्ण केल्या. एका शर्माने अपेक्षा पायदळी तुडवल्या! एक अनुभवी, दुसरा अननुभवी. दोन्ही क्रिकेटचं स्वरूपही वेगळं. सगळं मान्य. पण खेळाडू कसे प्रगल्भ व्हावेत याचा हा एक धडाच!
रद्द झालेल्या सामन्यातून अभिषेक नवीन धडे शिपून दुसऱया टी- ट्वेंटीसाठी तयारीने उतरेल ही त्याच्याकडून अपेक्षा आहे. अन्यथा, यशस्वी जयस्वाल जिभल्या चाटत बसलाच आहे!
ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्टय़ांना वश करणं सोपं नसतं असं भलेमोठे सांगून गेलेत. त्याकरिता चेंडूची उसळी, वेग अन् गोलंदाजांच्या काwशल्याला मान द्यावा लागतो. विलक्षण एकाग्रता आणि निर्धार एकवटावा लागतो. धोबीघाटावर कपडे बडवणं किंवा आडवा-तिडवा दांडपट्टा फिरवण्याएवढं ते काम सोपं नव्हें! अभिषेकने एवढे धडे शिकले तर मेलबर्नची खेळपट्टी त्याच्यासाठी पन्ना संधी उपलब्ध करू शकते.
कप्तान सूर्याला फिलिपने दिलेल्या जीवदानानंतर सूर सापडलेला दिसला. त्याने हेझलवूडला मारलेला फ्लिकचा षटकार आणि शुभमनने एलिसला हाणलेला सरळ ड्राईव्ह मजेदार होता. दोघांसाठीही धावा होणं आवश्यक होतं. गेल्या दहा डावांत सूर्या आणि शुभमन नजरेत भरणारी कामगिरी करू शकले नव्हते, मात्र पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात दोघांचाही ठसा जाणवला. यापुढे त्यावर इमले उभारणं फार अवघड ठरू नये.
ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज चतुर आहेत. ते टप्प्यात चेंडू टाकत नाहीत, कट-पुलसाठी आवश्यक जागा देत नाहीत आणि दिलीच तर त्यात त्यांचा कावा दडलेला असतो हे आपण पाहिलं आहे. तसंच चेंडूचा वेगही ते अगदी बेमालूमपणे कमी-जास्त करतात!
पहिल्या टी-ट्वेंटीसाठी गोलंदाज मात्र मस्त निवडले. बुमरा, राणा, दुबे हे जलदगती आणि अक्षर, वरुण आणि पुलदीप हे फिरकी. अगदी समतोल राखणारी गोलंदाजी संघात दिसली. हाच ताफा आजही दिसेलशी अपेक्षा.
मात्र बुमरा आणि राणाकडून माझ्या विशेष अपेक्षा आहेत. दोघांनाही वेळोवेळी आणि अनुक्रमे पुरेशी विश्रांती अन् संधी दिली जात आहे. राणाजींचा समावेश हिंदुस्थानतर्फे टी–ट्वेंटीत सर्वाधिक बळी घेणाऱया अर्शदीपचा बळी देऊन झालाय! पहिल्या सामन्यात बुमराला तसदी घ्यावी लागली नाही. त्यामुळे आता बाकी चार सामन्यांत त्याने आपली चार-चार षटपं टाकावीत अन् आम्हाला उपपृत करावं एवढी जसप्रीतप्राकडे पामराची याचना!
 
             
		




































 
     
    




















