
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडला. या सोहळ्याला ज्येष्ठ पटकथाकार, लेखक, कवी जावेद अख्तर यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी खणखणीत भाषण करत तुरुंगातील अनुभव व्यक्त केले. यापुढे ईडी आपल्या दारापुढे येणार नाही, ईडीचा बूच लावून ठेवलाय मी. मी शेवटचा माणूस होतो, ज्याच्या नादाला ईडी लागली. मै आखरी आदमी था, जिसके साथ ईडीने पंगा लिया, अब नहीं लेंगे, अशा रोखठोक शब्दांत संजय राऊत यांनी ईडीचा समाचार घेतला.
जावेद अख्तर, साकेत गोखले, शरद तांदळे यांच्या हिंमतीचे कौतुक करताना संजय राऊत यांनी ईडीच्या चक्रव्यूहावर सडकून टीका केली. साकेत आणि मी आमच्या दोघांमध्ये साम्य असं आहे की, मी त्याच्यामध्ये माझी प्रतिकृती बघतो. ते ही तुरुंगात होते ईडीच्या चक्रव्यूहात आणि मी सुद्धा होतो. आमचे शरद तांदळे.. त्यांनी खरोखरच हिंमतीचे काम केलं आहे. उद्या तुम्ही ईडीसाठी दरवाजे उघडे ठेवा. पण एक सांगतो, यापुढे ईडी आपल्या दारापुढे येणार नाही, ईडीचा बूच लावून ठेवलाय मी. मी शेवटचा माणूस होतो, ज्याच्या नादाला ईडी लागली. मै आखरी आदमी था, जिसके साथ ईडीने पंगा लिया, अब नहीं लेंगे, असे संजय राऊत म्हणाले.
भाषणामधून ईडीचा समाचार घेतानाच त्यांनी ज्येष्ठ पटकथाकार जावेद अख्तर यांचे भरभरुन कौतुक केले. ते म्हणाले, जावेद अख्तर साहेब केवळ पटकथाकार, लेखक नाहीत. जिथे जिथे देशात अन्याय घडेल, तिथे जावेद साहेब सातत्याने आपला आवाज उठवत असतात. जावेद साहेबांचं इथं असणं हे अत्यंत प्रेरणादायी आहे. माननीय शरद पवार साहेब, त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊच शकत नाहीत. ते ही पडद्यामागून आमच्यासाठी अशा अनेक लढाया लढत राहिले आणि समोरूनही लढत असतात. माननीय उद्धव साहेब माझे सर्वोच्च नेते, मित्र आणि सदैव माझ्या पाठिशी ते उभे राहिले. आणि खास पाहुणा जो आपण कोलकात्त्यातून बोलावला आहे. त्यांचं नाव गोखले आहे. आता साकेत गोखले कोलकात्त्यात कुठे गेले? ते तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत आणि ममता बॅनर्जींनी त्यांना खास बोलावून खासदार केलं. का? महाराष्ट्रातून एक लढवय्या त्यांना हवा होता कोलकात्त्यात. आमच्या दोघांमध्ये साम्य असं आहे की मी त्याच्यामध्ये माझी प्रतिकृती बघतो. ते ही तुरुंगात होते ईडीच्या चक्रव्यूहात आणि मी सुद्धा होतो. साकेत गोखले हे काही काळापासून एक तरुण राजकारणी, उत्तम पत्रकार, उत्तम लेखक आहेत ते. ते मूळचे मुंबईचे आहेत.
संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाचे प्रकाशक न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसचे शरद तांदळे यांच्या हिंमतीला दाद दिली. आमचे शरद तांदळे हिंमतीचे काम त्यांनी खरोखर केलेले आहे. उद्या तुम्ही ईडीसाठी दरवाजे उघडे ठेवा. पण एक सांगतो, यापुढे ईडी आपल्या दारापुढे येणार नाही, ईडीचा बूच लावून ठेवलाय मी. मी शेवटचा माणूस होतो ईडी त्याच्या नादाला लागली. मै आखरी आदमी था, जिसके साथ ईडीने पंगा लिया, अब नहीं लेंगे, असा जबरदस्त टोलाही यावेळी त्यांनी हाणला.
पुस्तकावर बरीच चर्चा सुरु आहे ती असालयाच पाहिजे. अगर मै एक एडिट लिखता हू तो उसकी चर्चा होती है, किताब लिखता हू तो होनी ही चाहिए. एक संपादकीय मी लिहितो त्याची रोज चर्चा होते. मग जेव्हा एक पुस्तक लिहिलं त्याची चर्चा झाली नाही तर उपयोग काय? दोन दिवसांपासून अनेकांना मिरच्या लागलेल्या आहेत. धडाधड सोशल मीडियावर सुरू आहे, उसने ये लिखा, उसने वो लिखा. पण जे लिहिलंय ते सत्य आहे, वो सच है. आणि माझी ओळख जी माननीय बाळासाहेब ठाकरेंमुळे झाली. सत्य आणि नितिमत्ता या दोन गोष्टींची कास तू सोडू नको, हे बाळासाहेबांनी मला वारंवार सांगितलं, ते मी शेवटपर्यंत पाळलं.
जावेद अख्तर यांना उद्देशून संजय राऊत पुढे म्हणाले, आपकी दो लाईने मुझे हमेशा याद आती है, जो बात कहते डरते है सब वो बात लिख, इतनी अंधेरी थी न कभी रात लिख. डरना नहीं है वो लिखो. बहुत जोर से कहा है जावेद साहबने. हम लिखनेवाले लोग है, हम बोलनेवाले भी लोग है. आम्ही वाकणार नाही, साकेत वाकला नाही, संजय सिंग झुकला नाही. आमचे अनिल देशमुख. आम्ही ठरवलं की काही झालं तरी या जुलमी शासन व्यवस्थेच्या रणगाड्यासमोर आपण झुकायचं नाही, आपण लढत रहायचं. कुणीतरी लढावंच लागेल. पुस्तक जेव्हा तुरुंगात लिहायचं ठरवलं. मी त्यांनाही प्रेरणा दिली….देशमुखांना. वेळ घालवायचा आहे ना, जेलमध्ये एक मिनिट एक वर्षासारखा वाटतो. जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता, त्यातून झुकून जावं लागतं आणि झुकून यावं लागतं.
जेव्हा तुम्ही आत जाता तेव्हा तुमचा जगाशी संबंध तुटतो. मग तुम्ही करायचं काय? बाहेरचा संपर्क नाही, संबंध नाही. दगडाच्या भिंती बघायच्या आणि दिवस काढायचे. अशामध्ये लिहिणं, वाचणं, चांगला सकारात्मक विचार करणं आणि उद्या मी कदाचित बाहेर पडेन हा विचार करायचा. कधी देशमुख साहेब बाहेर पडले, आज तुमचा जामीन होणार, डोन्ट वरी. कधी मी बाहेर पडलो, आज तुमचं आर्ग्युमेंट चांगलं झालं. अशामध्ये दोन-चार, पाच महिने निघून जातात. आणि त्यातून कुणी एखादा सुटलाच तर तो कसा सुटला त्याच्यावरती अख्खं जजमेंट घेऊन अभ्यास करायचा. सगळे जजमेंट वाचत बसल्यावर कळते कोणता पॉईंट काय आहे? हे सगळे तुरुंगातले लोक बॅरिस्टर होऊन बाहेर पडतात. आठ दिवस जरी तुरुंगात राहिला तर तो सर्वोच्च न्यायालयापासून हायकोर्टापर्यंत… कसं चालवायचं कोर्ट आणि कोणता जज, कोणतं बेंच, ये क्या है? यावर पीएचडी होते. हे सर्व वेगळं जग आहे. पण त्यातून आपण आलो, एक राजकीय लढाई असते.
आम्ही ज्या आर्थर रोड तुरुंगात होतो. तिथे एकदा आम्ही उभे होतो, मला वाटलं की इथे ससे कुठून आले? आमच्याबरोबर कुंदन शिंदे होते, ते म्हणाले साहेब तो ससा नाही उंदीर आहे. त्याला म्हटलं इथं आम्हाला खायला मिळत नाही.. उंदरांना काय खायला मिळतयं. सशासारखे उंदीर, घुशी.. उंच धिप्पाड. देशमुखांनी त्यांना सुंदर नावं ठेवली होती. आता त्यांच्याविषयी बोलणं बरं नाही, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आपण मर्यादा पाळल्या पाहिजेत. त्याच्यातून हे पुस्तक निर्माण झालं. पण एक सांगतो, तुरुंगातलं वैशिष्ट्य असं आहे की, माझा सामनातला अग्रलेख… हर दिन मेरा एडिट बाहर आता था.
सरकारने चौकशी कमिशन लावलं होतं. सामना का एडिटोरियल बाहर कैसा आ रहा है. रोज माझं रोखठोक कॉलम बाहेर यायचं. मै खूश होता था मेरा काम हो रहा है. अंदर की बात अंदरही. अखबार तो निकल रहा है ना, लढाई तो जारी है. पण या सगळ्या जरी कटू आठवणी असल्या तरी माझ्यासारखा माणूस जो आहे तो मनाने कधी खचत नाही. मी ज्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, त्या माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सदैव आम्हाला तीच प्रेरणा दिली कि खचू नका, आत्मविश्वास महत्वाचा आहे.
मी एकदा ईडीच्या कोठडीत होतो आणि सरकारवर भयंकर टीका करणारं माझं रोखठोक प्रसिद्ध झालं. मी ईडीच्या आतमध्ये बसून आहे आणि सर्व नॅशनल चॅनेलला बातम्या, संजय राऊत तो जेल में है तो लिखा किसने? रात्री साडेअकरा वाजता दोन अधिकारी मला उठवायला आले. म्हणाले आपका स्टेटमेंट लेना है. मी विचारले का? ते बोलले, जबाब घ्यायचा आहे. चार दिन हो गया आप यहा बैठे है और आपका आर्टिकल आज पब्लिश हो गया, टीव्ही पर चल रहा है. राज्यपालांवर मी लिहिलं होतं, तेव्हाच्या टोपीवाल्या, हे कसे महाराष्ट्रद्रोही आहेत. आणि ती चौकशी लागली. मी म्हणालो, ‘लो मेरा स्टेटमेंट लो आप, मै पहले लिखकर आया था, मुझे पता था ये गंदगी करनेवाला है.’ हे स्टेटमेंटमध्ये आहे माझ्या. बोललो.. आपके यहा तो सीसीटीव्ही फुटेज है, देख लो कैसे गया वो. प्रत्येकाच्या या कथा फार सुंदर आहेत, रोमांचक आहेत.
साकेतने माझ्यापेक्षा वाईट दिवस काढलेले आहेत. साकेत गुजरातच्या साबरमती तुरुंगात होता. साकेतला विमानतळावरून उचललं. साकेत सात महिने तुरुंगात होता. आम्ही त्याच्या मानाने कमी राहिलो. त्याचा अनुभव जास्त आहे. त्याबाबतीत तो मला ज्येष्ठ आहे. 80 टक्के पुस्तक तुरुंगात लिहून झालं, 20 टक्के लिहायला दोन वर्षे लागली. दोन वर्षांत निवडणुका आल्या. मुली मागे लागल्या, बाबा लिहा पूर्ण करा. शेवटी लिहून झालं पुस्तक, ते प्रसिद्ध झालंय. सर्वात महत्वाची गोष्ट आम्ही ज्या कसाबच्या बराकमध्ये राहिलो होतो, ते कुणी बनवलं आमच्या जयंत पाटलांनी. आता काय सांगणार. जयंतराव पाटील गृहमंत्री, इंजिनिअर आदमी है ये. कसाब के लिए स्पेशल बराक कैसे होना चाहिए इसका डिझाईन ये जयंतराव पाटीलने बनाया और बाद में हमको अंदर भेज दिया. और मेरे को बाद में पूछता कैसा था, ये मैने बनाया है. या सर्व गमतीजमती पुस्तकामध्ये आहेत. कटु आठवणी असतातच, पण त्या कटु म्हणून घ्यायच्या नाहीत, तो अनुभव म्हणून घ्यायचा.
उद्धवजींनी पुस्तक वाचलं आणि एका वाक्यात पुस्तकाचं वर्णन केलं… पुस्तकात रडगाणं नाही आहे. पकडा ठीक है, गया जेल में, वापस आ गया, जिसने मुझे पकडा उसको पश्चाताप हो गया. झक मारली आणि याला पकडला. अरे हम गुंडे लोग है, हम जेल जाने से नहीं डरते. देश को ऐसे लोगों की जरुरत है. लोहा लोहे को काटेगा अभी. पूरे देश में एक माहौल बन गया है.
या पुस्तकाचं सार काय आहे? हे पुस्तक राजकीयच आहे. ज्याला विरोधी पक्षात काम करायचं आहे, त्याने हे पुस्तक वाचलं पाहिजे. ज्याला सत्तेची चाटूगिरी करायची आहे, सत्तेसाठी सर्वकाही करायचं आहे, त्याच्यासाठी हे पुस्तक नाही. ज्यांना विरोधी पक्षात राहून देशाचं काम करायचं आहे. या पुस्तकाचा सर्वात शेवटचा सार असा आहे की महाराष्ट्र गांडू नाही आहे. महाराष्ट्र मर्दों की औलाद आहे. या पुस्तकाचं एक महत्व आहे. आमच्यासारखे असंख्य लोक आहेत, अनेकांना त्रास झाला. अनिल परबांना त्रास झाला. झुके नहीं, आज भी लढते रहे.. रहेंगे. आज भी मै कोर्ट में जाता हू. जज के सामने खडा रहता हू, बोलिए क्या है वापस अरेस्ट करोगे, क्या करोगे आप. तानाशहा कब तक तानाशाही करता रहेगा? केव्हा ना केव्हा तरी त्या हुकूमशहालाही जमिनीत गाडलं जातं. हा देशाचा इतिहास, नाही जगाचा इतिहास आहे. सगळे मोठ्या संख्येने इथे आलात. ते माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. या पुस्तकातून लढण्याची प्रेरणा जरी 100 लोकांनी घेतली तर या देशातून, राज्यातून हुकूमशाही पूर्णपणे नष्ट होईल, गाडली जाईल. जे राज्याला, आपल्याला अपेक्षित आहे लोकशाहीचं राज्य.. ते या देशात आणि महाराष्ट्रात येईल.. काही लोकांनी महाराष्ट्राचा नरक केला आहे, त्याचा स्वर्ग करण्याची प्रक्रिया आता सुरू होईल, असा आशावाद संजय राऊत यांनी भाषणाच्या शेवटी व्यक्त केला.