भाजपने ट्रम्प पुढे शरणागती पत्करली, त्यामुळे त्यांना ‘डोनाल्ड जत्रा’ भरवावी लागेल; संजय राऊत यांनी फटकारलं

नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी तिरंगा यात्रा काढणाऱ्या भाजपला फटकारले आहे. भाजपने ट्रम्प पुढे शरणागती पत्करली, त्यामुळे त्यांना ‘डोनाल्ड जत्रा’ भरवावी लागेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. संजय राऊत यांनी नाशिकमध्ये मध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत हिंदुस्थानने पाकिस्तानवर कारवाई करत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. यात हिंदुस्थानच्या सैन्याने यशस्वी कामगिरी केली. या पार्श्वभूमीवर भाजप तिरंगा यात्रा काढणार आहे. भाजपच्या या तिरंगा यात्रेवरून संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे. ‘तिरंगा यात्रा काढून चालणार नाही, त्यांना अमेरिकेत ट्रम्पचाच झेंडा हातात घ्यावा लागेल. त्यांनी तिरंग्याचा अपमान केला आहे’, असे संजय राऊत म्हणाले.

हिंदुस्थानी सैन्याला आणखी चार दिवस मिळाले असते तर, POK सोबत कराची आणि लाहोरही घेतलं असतं – संजय राऊत

‘भारतीय जनता पक्षाने डोनाल्ड ट्रम्प पुढे शरणागती पत्करली आहे. त्यामुळे त्यांना आता यापुढे गावागावात ‘डोनाल्ड जत्रा’ भरवाव्या लागतील. आणि अमेरिकेचा झेंडा घेऊन त्यांना फिरावं लागेल’, अशा शब्दांत संजय राऊत यांनी फटकारले. ‘अद्वय हिरे यांनी बॅनर लावले, मी बघितले. गद्दारांचा समाचार आम्ही घेणारच, चालूच आहे. आणि यांची काय ताकद आणि हिंमत आहे? ट्रम्प पुढे झुकणारे यांचे नेते आहेत. मिंधे आणि अजित पवार यांचे’, अशी खरमरीत टीकाही संजय राऊत यांनी केली.