
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पूरामुळे शेतकऱ्यांची शेतंच्या शेतं उद्ध्वस्त झाली आहेत.दरम्यान भाजप आमदार व खासदारांनी त्यांचे एक महिन्याचे संपूर्ण वेतन शेतकऱ्यांना मदत म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे.दरम्यान उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना कोरोना काळात याच भाजप खासदार,आमदारांनी त्यांचे एका महिन्याचेल वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला न देता पंतप्रधान सहायता निधीला दिले होते. या गोष्टीची आठवण करून देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपलाल फटकारले आहे.
”भाजपाआमदारानी एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांसाठी देण्याचे ठरवले, करोना काळात याच भाजपा आमदारानी त्यांचे वेतन मुख्यमंत्री निधीला देण्या ऐवजी पंतप्रधान सहायता निधीला दिले,महाराष्ट्राचा हा अपमान होता.ढोंग आणि बनावटगिरी म्हणायचे ते यालाच”,अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपच्या दुटप्पीपणावर टीका केली.