‘वाल्यां’नीच भाजपचे वस्त्रहरण केलं – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पिंपरी

स्वर्गीय अटलजींची भाजप आत्ता शिल्लक राहिलेली नाही. बाहेरून, इतर पक्षातून केवळ सत्तेसाठी आलेल्यांची भाजप झाली आहे. सत्तेसाठी एकवटलेल्या ‘वाल्यां’नीच भाजपचे वस्त्रहरण केलंय, असा टोला शिवसेना नेते, पुणे विभागीय संपर्क नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला.

शिवसेनेच्या मावळ, पिंपरी-चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केल्यानंतर खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार राऊत पुढे म्हणाले, महाराष्ट्राला एक थोर परंपरा आहे. महिलांचा सन्मान राखण्याची शिकवण इथल्या मातीने दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा यथोचित गौरव केला. त्याच महाराष्ट्रात महिलांचा घोर अपमान होतोय. महिला, माता-भगिनी सुरक्षित राहणार की नाही? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला.

खासदार राऊत म्हणाले, देशाच्या जवानांच्या पत्नीबाबत प्रशांत परिचारक यांनी आधी गुण उधळले. त्यानंतर तो छिंदम की कोण हा शिवरायांच्या प्रति गरळ ओकतो. आत्ता हा घाटकोपरचा आमदार माता भगिनींबाबत बोलतो. महिलांप्रति बोलणाऱ्या अशा या ‘टोळ्या’ भाजपमध्ये वाढत आहेत, ही विकृती सत्ताधाऱ्यांमध्ये वाढते आहे. अशा प्रकारची विकृती पक्षात वाढत असेल, तर महाराष्ट्राच्या ‘सभ्य’ मुख्यमंत्र्यांसमोर हे फार मोठे आव्हान आहे. त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका काय? हे स्पष्ट केले पाहिजे. भाजपचे प्रवक्तेही अशावेळी कुठंतरी तोंड लपवून बसले आहेत.

माता-भगिनींचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही पक्षाने उमेदवारी
आव्हान आहे. त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका काय? हे स्पष्ट केले पाहिजे. भाजपचे प्रवक्तेही अशावेळी कुठंतरी तोंड लपवून बसले आहेत. माता-भगिनींचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये, हे सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले असून, महाराष्ट्राच्या विधिमंडळातही अशा व्यक्तीला जागाच देऊ नये. राम कदम यांच्या निलंबनाला शिवसेनेचा पाठिंबाच असणार आहे आणि तो निलंबनाचा ठराव भाजपने मांडावा, असेही संजय राऊत म्हणाले. सध्या सुरू असलेल्या इंधन दरवाढीबाबत ते म्हणाले, संपूर्ण देशाची अर्थव्यवस्थाच पूर्णपणे ढासळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या राजवटीपेक्षा भयंकर वाईट परिस्थिती सध्याच्या भाजप राजवटीत पाहायला मिळते. केवळ ठेकेदार पोसण्याचे काम भाजपचे मंत्री, पदाधिकारी करीत आहेत.

नगरसेवकांपासून आमदार, खासदारांपर्यंत सर्वच जणांना विकत घेण्याची प्रवृत्ती वाढत असून, हे राज्यच ठेकेदारांमार्फत चालविले जात आहे, असा आरोप करत खासदार संजय राऊत म्हणाले, विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होणार नाहीत आणि झाल्या तरीही आम्ही घाबरत नाही. साम, दाम, दंड, भेद या सर्व नीतींचा आम्ही उपयोग करू. कारण, ही आमची लोकनीती आहे, राजनीती नाही. सन २०१४च्या वावटळीत शिवसेनेला यश आले नाही. परंतु, सन २०१९ मध्ये नक्कीच यश आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री सन २०१९ मध्ये महाराष्ट्राचा असणार आहे, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

summary- sanjay raut slams bjp over ram kadams statement