संकटे व वादळात शरद पवार यांचे नेतृत्व खंबीर; संजय राऊत यांचे ट्विट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. संजय राऊत यांनी स्वतŠ ट्विट करून या भेटीची माहिती दिली. संकटे व असंख्य वादळांमध्ये शरद पवार यांचे नेतृत्व खंबीरपणे उभे आहे असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले.

महाविकास आघाडीने पूर्ण केलेला एक वर्षाचा कार्यकाल व उद्या होणारी विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी ही भेट झाली. या दोन नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. या भेटीनंतर संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.

काय म्हटले ट्विटमध्ये
आदरणीय शरद पवार यांना भेटलो. महाराष्ट्रातील राजकीय परिवर्तनात त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचा कामाचा उरक व उत्साह थक्क करणारा आहे. संकटे व असंख्य वादळात त्यांचे नेतृत्व खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. नक्कीच आणि निश्चित…असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.a