Sanjay Raut News – काकांची साथ सोडल्यावर अजित पवारांची अधोगती सुरू झाली, राऊत यांची टीका

>> राजेश देशमाने, अकोला

जोपर्यंत अजित पवार काकांच्या सल्ल्याने जात होते तोपर्यंत अजितच पवारांच बरं चालत होतं, पण त्याना काकांची साथ सोडली आणि त्यांची अधोगती सुरू झाली अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.

अकोल्यातल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, सल्ला देण्यासाठी अजित पवार यांनी एक एजन्सी नेमली आहे. अजित पवार आतापर्यंत आपल्या काकांच्या सल्ल्याने जात होते तोपर्यंत बरं सुरू होतं. काकांची साथ सोडल्यावर त्यांची अधोगती सुरू झाली असे राऊत म्हणाले.

तसेच त्यांची पावलं चुकीच्या दिशेने पडू लागली. हे लोकसभा निवडणुकीत दिसल्यावर त्यांनी एजन्सी नेमली. ही एजन्सी नेमण्याची पद्धत भाजपने आणली. याचा अर्थ त्यांना राजकारणातलं काही कळत नाही. ते त्यांच्या सल्ल्याने त्यांचे विधान आले असेल. जे ज्ञान महाराष्ट्राच्या जनतेला होतं की ते जे काही करत आहेत ते चुकीचे आहे. बारामती विरुद्ध पत्नी हा सामना चुकीचा आहे हे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला कळत होतं. ते चार पाचवेळ उपमुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला कळले नाही. याचा अर्थ ते राजकारणात फिट नाही असेही राऊत म्हणाले.