संजीव भट्ट यांना ट्रान्सफर वॉरंटवर अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sanjiv-bhatt

निलंबित करण्यात आलेले आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना विशेष स्थापन केलेल्या एसआयटीने पालनपूर कारागृहातून ट्रान्सफर वॉरंटवर अटक केली. 2002 च्या दंगलीत एसआयटीने पीएम मोदींना दिलेली क्लीन चिट सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर, गुन्हे शाखेने यापूर्वी तीस्ता सेटलवाड आणि आरबी श्रीकुमार यांना ताब्यात घेतले होते.

ट्रान्सफर वॉरंटवर भट्ट यांना पालनपूर कारागृहातून अटक करण्यात आली होती. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले जाईल, असे एसआयटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.