सारा व जान्हवीचा इंटेन्स वर्कआऊट, पाहून तुम्हालाही फुटेल घाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सारा अली खान व जान्हवी कपूर या दोन्ही स्टार किड्सनी एकाचवेळी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या दोघीही सध्या स्वत:ला इंडस्ट्रीत सेट करण्यासाठी मेहनत घेत आहेत. नुकताच त्यांचा एकत्र वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सारा व जान्हवी दोघींनीही हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या दोघी नुकत्याच एकत्र गोव्याला गेल्या होत्या. तिथे त्यांनी त्यांच्या रिसॉर्टवर पूल साईडला एकत्र वर्कआऊट केला. साराची फिटनेस ट्रेनर नम्रात पुरोहित ही त्यांचा वर्कआऊट घेत असल्याचे दिसत आहे.

सारा अली खान गेले काही दिवस सतत फिरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तिने मालदिवच्या किनाऱ्यावर बोल्ड फोटोशूट केले होते. त्यानंतर ती भाऊ इब्राहिम व आई अम्रिता सिंग सोबत कश्मीरला गेली होती. तर जान्हवी देखील नुकतीच मालदिवला जाऊन आली आहे. त्यानंतर ती सारा व तिच्या काही मित्रमैत्रिणीसोबत गोव्याला गेली होती.

सारा व जान्हवी या दोघींनीही 2018 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जान्हवीने धर्मा प्रोडक्शनच्या घडक चित्रपटातून तर साराने केदारनाथ चित्रपटातून पदार्पण केलं.