व्हाईट हाऊसमध्ये ‘सारे जहां से अच्छा’

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये सोमवारी एका खास कार्यक्रमात हिंदुस्थानी संस्कृतीचे दर्शन घडले. कार्यक्रमात ‘सारे जहां से अच्छा’ या देशभक्तीपर गीताची धून मरिन बँडने वाजवली. तसेच पाहुण्यांना पाणीपुरीची खास डिश देण्यात आली. याचे व्हिडीयो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. व्हाईट हाऊसमध्ये आशियाई अमेरिकन, नेटिव हवाईयन आणि पॅसिफिक आयलँडर हेरिटेज मंथ साजरा करण्यात आला. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या सोहळ्याचे आयोजन केले. यामध्ये अमेरिकतील हिंदुस्थानींना निमंत्रित करण्यात आले. अजय जैन यांनी या कार्यक्रमाचे पह्टो एक्सवर शेअर केले आहेत.