साडी तिची सखी

>> लीना टिपणीस

विद्या बालन. साडी तिची आवड आणि तिला शोभूनही दिसते. आपल्या 800 साडय़ा विद्या फार प्रेमाने परिधान करते.

तिच्या भूमिका कायम वेगळ्या धाटणीच्या असतात…निवडक सिनेमे स्विकारायचे आणि त भूमिकेला न्याय द्यायचा हा तिचा लाईफचा फंडा आहे. तिच्या अभिनयाबरोबरच ती चर्चेत असते ते तिच्या कपडय़ांसाठी. पार्टी असो किंवा एखादा पुरस्कार सोहळा असो ही अभिनेत्री कायम साडीत हजेरी लावते. साडी तिला प्रचंड आवडते. अल़िकडेच तिच्या एका मुलाखतीत तिच्यासाडीवेडा विषयी सांगितले. तिला साडीचे वेडं इतकं आहे की तिच्या कपाटात तब्बल आठशे साडय़ा असल्याचे तिने सांगितले होते. ही साडीचे वेड असलेली अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. आज तिच्याविषयी अधिक जाणून घेऊया.

गोड हास्य आणि उत्कृष्ट अभिनय ही तिला देणगी आहे. देवाचे मी आभार मानते की विद्या बालन आता साडी नेसायला लागली. मधल्या काळात ती वेस्टर्न कपडय़ांमध्ये दिसायची. साडीपेक्षा तिला अन्यकुठलाही पेहराव तितका चांगला वाटत नाही जेवढी तिला साडी शोभून दिसते. विद्या बालनची व्हॅलप शेप बॉडी आहे शिवाय ती फारशी उंचही नाही आहे. हे दोन अपवाद सोडता तिला खरोखरच सुंदर चेहरा आहे. विद्या बालनला वेस्टर्न लूक फारसे शोभून दिसत नाही ती हिंदुस्थानी पेहरावातच खूप सुंदर दिसते. हिंदुस्थानी कुठल्याही पेहरावात ती उठून दिसते. त्यामुळे विद्या बालनला साडी जितकी शोभून दिसते तितका अन्य पेहराव तिला शोभून दिसत नाही असे मला वाटते. ती साडीत फार आकर्षक वाटते. साडीमुळे तिचा सुंदर चेहरा आणखी खुलतो. तिची चेहऱयाची ठेवण हिंदुस्थानी पद्धतीची आहे. तिचं गोड हास्य, तिची सुंदर त्वचा आहे. हे सगळं तिच्या पारंपरिक वेशावर अगदी साजेसं वाटतं. पारंपरिक कांजिवरम, गडवाल काहीही तिला शोभून दिसतं. विद्याचा मी आयुष्यात पाहिलेला सगळ्यात वाईट फोटो म्हणजे गुलाबी रंगाचा कुर्ता आणि त्यावर काळ्या रंगाचा बेल्ट घातला होता. त्या कपडय़ांमध्ये ती भयंकर कुरुप दिसत होती. त्यात तिने बरेच चित्रविचित्र रबरबॅण्ड्स एका हातात घातले होते. त्यात आणखी भयंकर म्हणजे तिने पायात घातलेले क्लॉगी ब्लॅक शूज. मला माहित नाही तिची तेव्हा स्टायलिस्ट कोण होती. पण त्या कपडय़ांमध्ये विद्या अजिबात चांगली दिसत नव्हती. त्यावेळी सगळ्यांमध्येच तिचा पेहराव हा चर्चेचा विषय झाला होता.

एक अपवाद वगळता आम्ही लॅक्मे फॅशन वीकसाठी एका स्लीम मॉडेलसाठी स्टनिंग रेड क्रिएशन कन शोल्डर फिटेड ड्रेस डिझाईन केला होता. फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानी स्टायलिस्ट होते. ते सॅव्ही या मासिकासाठी फोटोशूट करणार होते. अशा फोटोशूटसाठी आम्ही कपडे देतो. त्यांनी आमच्याकडून तो वन शोल्डर फिटेड ड्रेस आमच्याकडून घेतला. तोही विद्या बालनच्या सॅव्ही मासिकाच्या फोटोशूटसाठी घेतला. तो ड्रेस ज्यावेळी तिने घातला त्यावेळी ती फार सुंदर दिसत होती. पण मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच होत नव्हता. लॅक्मे फॅशन विकमध्ये तो ड्रेस एका स्लीम मॉडेलसाठी मी तयार केला होता. तेव्हा माझ्या मनात आलं की कसं काय विद्या बालनला हा ड्रेस फिट बसू शकते. इतकी बारीक ती झाली होती. मी फार आश्चर्यचकीत झाले होते. इतकं तिने स्वतःला मेण्टेन केलं होत. डाएट, पुरेसा व्यायाम यावर तिने मेहनत घेतली होती आणि त्यामुळेच ती त्या ड्रेसमध्ये फिट झाली. डेब्बू रत्नानी यांनी तिचे फोटोशूट केले होते, त्यावेळी विद्या बालनचा खूप सुंदर फोटो त्यांनी काढला होता. मी डिझाईन केलेला तो विद्याने घातलेला वन शोल्डर ड्रेस सॅव्ही मासिकाच्या मुखपृष्ठावर तिचा फोटो आला होता. मला कितीतरी वेळ विश्वास बसत नव्हता की विद्या त्या ड्रेसमध्ये मावली. कारण तो ड्रेस एका स्लीम मॉडेलसाठी केला होता. जॅकलीन फर्नांडिस, लिसा हेडन यांना त्या ड्रेसमध्ये पाहू शकत होते पण विद्या त्या ड्रेसमध्ये आणि सॅव्ही मासिकाच्या कक्हरकर. मी किचार करत राहिले तिने किती मेहनत घेतली असेल त्या ड्रेसमध्ये फिट होण्यासाठी. पण ते पहिल्यांदा आणि शेवटचा तिने तसा ड्रेस घातला होता आणि त्यात ती सुंदर, आकर्षक दिसत होती.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या