सरिताला कांस्य, ज्युनियरमध्ये 13 पदकांची कमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या बॉक्सर्सनी पोलंड येथे सुरू असलेल्या सिलेसियन ओपन बॉक्सिंग स्पर्धेत पदकांची लयलूट केली. हिंदुस्थानच्या ज्युनियर नेमबाजांनी सहा सुवर्ण, सहा रौप्य व एक कास्य पदकांसह एकूण 13 पदकांवर मोहोर उमटवली. सीनियर गटात एल. सरिता देवीने 60 किलो वजनी गटात कास्यपदक जिंकले. लोवलिना बोर्गोहेन व पूजा रानी यांनीही कास्य जिंकले.