
सामना प्रतिनिधी । सटाणा
गिरणा खोऱयातील पुनंद परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने पुनंद धरण भरले आहे. धरण क्षेत्रातील पाणीसाठय़ात वाढ झाली आहे. जलसाठा स्थिर ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ लागल्याने गिरणा नदीला पूर आला आहे. नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. पुनंद धरणातील या पाणीसाठय़ामुळे सटाणा, देवळा, कळवण तालुक्यांतील ग्रामस्थांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
पुनंद परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. पुनंद खोऱयातील नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले असून धरण क्षेत्रातील पाणीसाठा वाढल्याने धरणातून अठराशे क्युसेॊस पाण्याचा विसर्ग होऊ लागल्याने गिरणा नदीला पावसाळय़ातला पहिलाच पूर आला आहे. हे पाणी आज सायंकाळपर्यंत लोहोणेर गिरणा पुलापर्यंत येऊन पोहचल्याने सटाण्यासह देवळा पाणीपुरवठय़ासह शेती व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे चित्र आहे.
कळवण व गिरणा तसेच पुनंद परिसरात काल मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याबरोबर पश्चिमेकडील डोंगररांगांमधून पाण्याचे प्रवाह वाहू लागल्याने पुनंद खोऱयात सर्वच नाले-ओढे वाहू लागल्याने पुनंद धरणाच्या पातळीत वाढ होत आहे. पुनंद धरण क्षेत्रात गेल्या तीन-चार दिवसांत चांगला पाऊस झाल्याने पुनंद धरणातील पाणीसाठय़ात चौदा टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑगस्ट अखेरीसपर्यंत धरणाचे गेट खुले राहत असल्याने धरणात पाणीसाठा झाल्याबरोबर धरणातून उत्सर्ग होऊ लागला आहे. गिरणा दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र सध्या खामखेडा परिसरात पाहावयास मिळत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने कळवणच्या पश्चिम भागात हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
































































