
सातारा जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या एका कोरोना अनुमानित रुग्णाच्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात नवे तीन अनुमानित रुग्ण दाखल झाले आहेत.
अबुधाबी येथून प्रवास करुन आलेल्या 42 वर्षीय पुरुषाचे घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.
अबुधाबी येथून प्रवास करुन आलेल्या 28 वर्षीय युवकाला, कॅलिफोर्निया येथून प्रवास करुन आलेल्या ५१ वर्ष वयाच्या महिलेला तसेच अबुधाबी येथून प्रवास करुन आलेल्या ३९ वर्षीय पुरुषाला अशा एकूण तिघांना अनुमानित म्हणून शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. या तिघांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.































































