सातारा जिल्ह्यातील 200हून अधिक एसटी कर्मचारी कामावर झाले हजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी कर्मचाऱयांच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, सातारा विभागातील 28 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. दरम्यान, सातारा विभागीय कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व आगारांत सुमारे 200हून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले असल्याने कार्यालयीन कामकाज सुरू झाले आहे.

एसटीच्या सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव-खंडाळा, दहिवडी, कोरेगाव, मेढा, वडूज, फलटण या 11 आगारांतील कर्मचारी संपावर गेले आहेत. गेल्या आठवडय़ात साताऱयातून शिवशाही बसच्या स्वारगेटला दोन फेऱया झाल्या. त्यानंतर संबंधित कर्मचाऱयांमध्ये वादावादीचे प्रकार घडल्यानंतर बसस्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, त्यानंतर एकही बस धावली नसल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.

सातारा विभागाने रोजंदारीवर काम करणाऱया 188 कर्मचाऱयांना कामावर उपस्थित राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, कर्मचारी नोटीस घेऊन उपस्थित राहणार नसतील तर त्यांच्यावर महामंडळामार्फत निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. सातारा विभागातील सुमारे 28 कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले आहे.

सोलापुरात चालकाने एसटी बसच चोरून नेली!

सोलापूर – राज्यातील एसटी कर्मचारी बेमुदत संपाकर आहेत. या पार्श्कभूमीकर सोलापुरात एसटी चालकाने एसटी बस चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरणप्पा मडुअण्णा बेणुरे (रा. किंचूर, ता. दक्षिण सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाक आहे. सहायक कार्यशाळा अधीक्षक नीलेश कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक बरडे तपास करीत आहेत.