
साताऱयातील सेनॉर चौकात पाच दिवसांपूर्वी राडा करून कोयता नाचवत हल्ला करणाऱया टोळीला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. पाचजणांच्या टोळीमध्ये एका अल्पकयीन मुलाचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
सौरभ नितीन सपकाळ (वय 25, रा. रघुनाथपुरा पेठ, करंजे), ऋत्किक धनंजय पंडित (वय 21, रा. गडकर आळी, सातारा), अक्षय संतोष कदम (वय 20, रा. करंजे पेठ, सातारा), अतिश गौतम राजगुरू (वय 22, रा. दौलतनगर, सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 जुलै रोजी रात्री सेनॉर चौकात राडा झाला होता. पाचजणांच्या टोळक्याने ओंकार पवार यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील 2 हजार 800 रुपयांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. तसेच तक्रारदारांच्या चारचाकी कारवर कोयता मारून तोडफोड करत दहशत पसरवली होती. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले पाच दिवस पोलीस संशयितांचा शोध घेत होते. संशयित म्हसके येथे केण्णा नदी परिसरातील शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने सात तास शोधमोहीम राबवल्यानंतर संशयित पोलिसांच्या हाती लागले. उर्वरित संशयितांची माहिती घेतली असता, शिराळा (जि. सांगली) येथे असल्याचे तांत्रिक तपासामध्ये समोर आले. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने तिकडे जाऊन कारवाई केली. संशयितांकडून पोलिसांनी कोयता, लोखंडी पाईप, दोन दुचाकी व 2 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, सुरेश घोडके, नीलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे यांनी कारकाईत सहभाग घेतला.

























































