सातारा जिल्ह्यातील चार अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह

कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमधील विलगीकरण कक्षात सातारा जिल्ह्यातील 3 वर्षीय मुलाला ताप, खोकला, श्वसनास त्रास होत असल्याने व 15 वर्षीय मुलीला ताप, खोकला असल्याने दाखल केले होते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एनआयआयव्ही, पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 2 निकट सहवासितांना सातारा जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एनआयआयव्ही, पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या