
ट्रॅव्हलरला वाचवताना चालकाचा ताबा सुटल्याने एसटी बस झाडाला धडकली. या अपघातात शालेय विद्यार्थ्यांसह 30 जण जखमी झाले. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. साताऱ्यातील पाटण तालुक्यात जानुगडेवाडी येथे ही घटना घडली.
जानुगडेवाडी येथील धोकादायक वळणावर ही घटना घडली. जखणींमध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. अपघातातील गंभीर जखमींना कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.