साताऱ्यात उदयनराजे भोसले पिछाडीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
udayanraje-bhosale

महाराष्ट्र आणि हरयाणात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत असून महाराष्ट्रात जनतेचा कौल कोणत्या पक्षाला मिळेल याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीचीही मतमोजणी सुरू असून यात राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले उदयनराजे भोसले  10 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. येथे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी आघाडी घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रचारसभेत लोकांच्या हितासाठी भाजपमध्ये गेल्याचे भोसले यांनी सांगितले होते. पण भोसले यांच्या या निर्णयावर त्यांच्याच पक्षांचे कार्यकर्ते नाराज झाल्याचे बोलले जात होते. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी साताऱ्यातील सभा गाजवली. धो धो पडणाऱ्या पावसात मतदारांच्या मनाचा ठाव घेणारं भाषण पवारांनी केलं आणि तिथेच साताऱ्यातील राजकारणाचं समीकरण बदललं अशी चर्चा सुरू झाली. पण उदयनराजे यांनी आपला विजय निश्चित असल्याचं भाकित केलं होते.  गुरुवारी साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीचीही मतमोजणी सुरू असून त्यात उदयनराजे 10 हजार मतांनी पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे.