24 हजार पाकिस्तानी भिकाऱ्यांची हकालपट्टी; सौदीने उचलले कडक पाऊल

पाकिस्तानमधून भिकारी आणि गुन्हेगार मोठय़ा प्रमाणात आखाती देशात उच्छाद मांडत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या नागरिकांना व्हिसा देण्यावर निर्बंध आणले आहेत. आता मुस्लिम देशांनी पाकिस्तानच्या 24 हजार भिकाऱयांना हद्दपार केले आहे.

सौदी अरेबियात मोठय़ा प्रमाणात पाकिस्तानी नागरिक घुसले असून तिथे भीक मागण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. हज यात्रेसाठी जगभरातून मुस्लिम सौदी अरेबियात येत असतात. पाकिस्तानी मीडियानुसार, परदेशात अटक करण्यात आलेल्या भिकाऱयांपैकी 90 टक्के भिकारी एकटय़ा पाकिस्तानातील आहेत.

यूएईने पाकिस्तानमधून येणाऱया नागरिकांना व्हिसा बंदी केली होती. डिसेंबर 2022 आणि त्यानंतर या व्हिसा बंदीला वारंवार मुदतवाढ देण्यात आली.  सौदी अरेबियाने या वर्षी भीक मागण्याच्या आरोपाखाली 24 हजार पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार केले आहे. दुबईने 6 हजार, तर अझरबैजानने सुमारे 2,500 पाकिस्तानी भिकाऱयांना परत पाठवले.