‘सौदी’ने पाकिस्तानला 1 अब्ज डॉलरचे कर्ज फेडायला लावले

1830

जम्मू -कश्मीर प्रश्नाकरून ओआयसी संघटनेची साथ न मिळाल्याने पाकिस्तानने सौदी अरेबियाला जबाबदार धरत सौदीवर जाहीर आगपाखड केली होती. त्याचाच परिणाम म्हणून सौदी अरेबियाने पाकिस्तानला तात्काळ 1 अब्ज डॉलरचे कर्ज फेडायला भाग पाडले आहे. जम्मू-काश्मीरच्या मुद्दावर पाकिस्तानला ओआयसी संघटनेची साथ मिळू शकली नाही. त्यासाठी पाकिस्तानने सौदी अरेबियाला जबाबदार धरलं आहे. ओआयसीकडून अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सौदी अरेबियावर जाहीरपणे टीका केली होती. त्याची किंमत आता पाकिस्तानला चुकवावी लागत आहे. 2018 मध्ये सौदीने पाकिस्तानला 3.2 अब्ज डॉलरचे कर्ज दिले होते. पाकिस्तानने जाहीरपणे सौदीवर टीका त्यानंतर सौदीने कर्ज फेडायला सांगणे हे सौदी आणि पाकिस्तानमध्ये आता पूर्वीसारखे घनिष्ठ संबंध राहिले नसल्याचे संकेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या