पक्ष्याच्या घरट्‍यासाठी आलिशान गाडीचा त्याग, दुबईच्या राजपुत्राने दाखवली माणुसकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका पक्ष्याच्या घरट्या साठी माणसुकीचं दर्शन घडवणाऱया दुबईच्या राजपुत्राचे सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे. शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम असे त्यांचे नाव आहे.


View this post on Instagram

A post shared by Fazza (@faz3) on


क्राऊन प्रिन्स मकतूम यांना मर्सिडिज एसयूव्हीच्या बोनेटवर पक्ष्याने घरटं बनवल्याचे दिसलं. गाडीचा वापर करण्यासाठी त्यांना घरटं हटवावं लागणार होतं. पण घरट्यालत पक्ष्याने अंड दिलं होतं. त्यामुळे राजकुमार मकतूम यांनी घरटं न हटवता गाडीच बाजूला ठेवायचा निर्णय घेतला. तसेच गाडीच्या जवळपास कुणी जाणार नाही, याची खबरदारी घेतली. जोपर्यंत अंड्यातून पिल्लू बाहेर येणार नाही, तोपर्यंत ती गाडी चालवणार नाही, असं त्यांनी गेल्या आठवडय़ात इन्स्टाग्रामवरील व्हिडियोच्या माध्यमातून जाहीर केलं होतं. त्यानंतर प्रिन्स मकतूम यांनी आता नवा व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये अंड्यातून पिल्लू बाहेर येताना दिसत आहे. ’कधी कधी आयुष्यातील छोट्या गोष्टीही खूप मोठ्या ठरतात’, अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे. पक्ष्याच्या घरट्यागसाठी माणुसकीचं दर्शन घडवणाऱया या राजपुत्राचे नेटकरी भरभरून कौतुक करत आहेत.