
महेंद्रसिंग धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, कपिल देव यांच्या आयुष्यावर बायोपिक झाल्यानंतर आता हिंदुस्थानी क्रिकेटचा दादा अर्थातच सौरभ गांगुलीवरही लवकरच बायोपिक तयार होणार आहे. या बायोपिकमध्ये सौरभच्या क्रिकेटमधल्या दादागिरीला पडद्यावर जिवंत करण्यासाठी आयुष्यमान खुरानाची निवड निश्चित करण्यात आली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी ‘उडान’, ‘लुटेरा’ या सिनेमाच्या विक्रमादित्य मोटवाने यांच्यावर सोपविण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांत हिंदुस्थानी क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांवर बॉलीवूडमध्ये बायोपिक करण्यात आले आहेत. यात ‘भाग मिल्खा भाग’, ‘एम. एस. धोनी-अनटोल्ड स्टोरी’ या बायोपिकचे खूप कौतुक झाले होते.



























































