सौरभ कोठारीने पटकावले एनएससीआय स्नूकर जेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाच्या सौरभ कोठारीने मुंबईत पार पडलेल्या एनएससीआय अखिल हिंदुस्थानी स्नूकर स्पर्धेत आपल्याच संघाच्या लक्ष्मण रावतला बॉल्कलाइन-2022च्या बेस्ट ऑफ – 13  फ्रेम फायनलमध्ये 7-2 असे पराभूत करीत विजेतेपद पटकावले. नुकत्याच मेलबर्न येथे खेळवण्यात आलेल्या पॅसिफिक अंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये स्नूकर आणि बिलियर्ड्सचे विजेतेपद पटकावणाऱया कोठारीने रावतवर 95-17, 37-75, 64-05, 70-77, 116-01, 124-05, 70-23, 91-50, 71-39  असा सहज विजय मिळवला. कोठारीला या एनएससीआय जेतेपदासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तर उपविजेत्या लक्ष्मणला उपविजेता ट्रॉफी आणि एक लाख रुपये पारितोषिकादाखल देण्यात आले.