सौरभ गांगुलीचा टी-20साठी थम्सअप!

662

बीसीसीआयचा अध्यक्ष सौरभ गांगुली याने टी-20 क्रिकेटला थम्स अप दाखवला आहे. याप्रसंगी तो म्हणाला, टी-20 क्रिकेट हे क्रिकेटच्या प्रचार व प्रसारासाठी महत्वाचे आहे. मी आयपीएलमध्ये खेळलो. पण आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये मला जास्त खेळायला मिळाले नाही. मलाही या क्रिकेटमध्ये अधिक खेळायला आवडले असते, असे सौरभ गांगुली पुढे आवर्जून म्हणाला.

हिंदुस्थानचा क्रिकेटपटू मयांक अग्रवालशी लाईव्ह चॅट करताना सौरभ गांगुलीला नॅटवेस्ट फायनल व वर्ल्ड कप फायनलबाबत विचारले असता तो म्हणाला, दोन्ही फायनल माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. नॅटवेस्ट फायनलची लढत शनिवारी होती. स्टेडियम हाऊसफुल्ल झाले होते. आम्ही आमचा सर्वत्तम खेळ केला आणि जिंकलो. वर्ल्ड कपच्या फायनलबाबत सांगायचे झाल्यास त्या स्पर्धेत आम्ही ऑस्ट्रेलिया वगळता एकही लढत हरलो नाही. अंतिम सामना हरलो असलो तरी सर्व काही संस्मरणीय होते. ऑस्ट्रेलिया त्या जनरेशनचा सर्वोत्तम संघ होता, असे सौरभ गांगुली स्पष्टपणे म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या