
अंदमान बेटावर उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण उद्या, 12 डिसेंबर रोजी होणार आहे. त्याचबरोबर सावरकरांनी लिहिलेल्या ‘ने मजसी ने परत मातृभूमीला… सागरा प्राण तळमळला’ या गीताचा सन्मान सोहळादेखील होणार आहे. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार, पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अभिनेता रणदीप हुडा, शरद पोंक्षे आणि इतिहासकार-लेखक डॉ. विक्रम संपत उपस्थित राहणार आहेत.



























































