सविता गावडे यांचे निधन        

सविता गावडे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 57 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. फोर्ट येथील उद्योजक आणि गणराज गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्याम गावडे यांच्या त्या पत्नी होत.

सविता या वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात अधिकारी होत्या. येत्या जुलैमध्ये त्या निवृत्त होणार होत्या. परंतु त्या आधीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांचा दशक्रिया विधी आंबेगाव तालुक्यात अवसरी येथील गावडेवाडीत शुक्रवार, 26 एप्रिलला सकाळी 7.30 वाजता होणार आहे.