चाकरमानांच्या परतीच्या प्रवासात अपघाताचे विघ्न, पावसामुळे झाली पुरती दमछाक; एसटीने दिला दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या पनवेल स्थानकाजवळपास मालगाडी रुळावरून घसरल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वेळापत्रक कोलमडले आहे.तर ऑनलाईन तिकीट रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे असे सांगण्यात आले. तर कणकवली, कुडाळ, सावंतवाडी सर्व स्थानकात चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली आहे दरम्यान सावंतवाडी एसटी बस डेपो मधून दोन जादा बसेस बोरीवली या ठिकाणी पाठवण्यात आले असून यामध्ये एक बस स्लीपर कोच आणि दुसरी साधी बस असल्याचे सांगण्यात आले. कोकण रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने मदतीचा हात पुढे केलेला असताना त्यातच सिंधुदुर्गात सुरू झालेल्या धुंवाधार पावसाने चाकरमान्यांची पूरती दमछाक होत आहे.

कोकण रेल्वे लोहमार्ग मोकळा होत असल्याने मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस आणि गुजरात कडे जाणारी उधना एक्सप्रेस संध्याकाळी तीन तासांहून अधिक उशिराने धावणार आहे असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान रविवार 1 ऑक्टोबर रोजी रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्याने सावंतवाडी रेल्वे स्थानकावरून प्रवासी तिकीटाची रक्कम 49 हजार 631 रूपये परत रोख स्वरूपात देण्यात आले.

कोकण रेल्वे मार्गावरील कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, तुतारी एक्सप्रेस,दिवा एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र आता रेल्वे मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस आणि गुजरातच्या दिशेने जाणारी उधना एक्सप्रेस धीम्या गतीने धावत आहे. अचानक रेल्वे गाड्या रद्द झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या मदतीला आता राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस धावताना दिसत आहेत.

सिंधुदुर्गातून सावंतवाडी, कुडाळ, कणकवली 6 बसेस या रेल्वे स्थानकातून थेट मुंबईला सोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये सावंतवाडी मधून 2, कणकवलीतून 3, कुडाळमधून 1 अशा सहा गाड्या रेल्वे स्थानकातून सोडण्यात येत आहेत. कोकणात गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमानांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे त्यामुळे कुठेतरी प्रवाशांना दिलासा मिळवा, यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू असल्याचे दिसत आहे. जे रेल्वे प्रवासी तिकीट कॅन्सल करतील त्यांना रेल्वे स्थानकामध्ये बस उपलब्ध व्हावी यासाठी ही एसटीने सेवा दिली जात आहे.