एसबीआयने सरकारला दिले 8 हजार कोटी

भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने सोमवारी आर्थिक वर्ष 2024-25 साठी केंद्र सरकारने 8,076.84 कोटी रुपयांचा डिव्हिडेंड दिला आहे. एसबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन त्यांच्याकडे चेक सोपवला. एसबीआयने 2024-25 साठी 15.90 रुपयांचा प्रति शेअर लाभांश घोषित केला होता. बँकेने गेल्या वर्षी सरकारला 6,959.29 कोटी रुपयांचा लाभांश दिला होता. एसबीआयला 2024-25 मध्ये 80,901 कोटींचा निव्वळ नफा मिळाला आहे.