सर्वोच्च न्यायालयाकडून पी चिंदबरम यांना झटका, जामीन अर्ज फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिंदबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे अंलमबजावणी संचालय त्यांना कधीही अटक करू शकते.

चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडियासाठी फॉरेन इन्वेस्टेमेंट प्रमोशन बोर्डाकडून बेकायदेशीररित्या परवानगी देण्यासाठी 305 कोटींची लाच घेण्याचा आरोप आहे. या केसमध्ये चिंदबरम यांना 24 वेळा अटक टळली आहे. यापूर्वी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाकडे अटक पूर्व जामिनाचा अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने तो फेटाळला होता. तेव्हा चिंदबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळालेला नाही. आता इडीकडून त्यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.