
नारायण पाटील । सेलू
वृक्षारोपणाचा नावाखाली दरवर्षी शासनाकडून वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्रत्येक कार्यालयाला देण्यात येते. परंतु बऱ्याच कार्यालयात केवळ फोटो पुरतेच वृक्षारोपण होते. दरवर्षी एकाच खड्यात थातुरमातुर वृक्षारोपण करून निधी हडप केला जातो. दरवर्षी कोट्यावधी झाडे लावल्याचा दावा केला जातो. परंतु त्यातील बरीचशी झाडे केवळ त्यांचे संवर्धन न झाल्यामुळे जळून जातात व पुन्हा त्याच खड्यात नवीन झाडं लावली जातात. आणि खड्डे मारल्याची मजुरी कागदोपत्री दाखवून तो निधी हडप केला जातो.
सध्या पावसाळा सुरू असून सर्वत्र कोट्यावधी वृक्ष लागवड करण्याबाबत घोषणा करण्यात येत आहेत. परंतु अजूनही कोठेच वृक्षारोपण झालेले दिसून येत नाही. दरवर्षी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कोटीच्या घरात असते. परंतु हे सर्व नियोजन कागदावरच असल्याचे स्पष्ट चित्र आता पहावयास मिळत आहे. या नियोजनानुसार जर दर वर्षी वृक्षारोपण झाले असते तर महाराष्ट्र आतापर्यंत हिरवागार व्हायला हवा होता. परंतु सतत होणारी वृक्ष तोड व त्यांची खाबूगिरी यामुळेच महाराष्ट्र उजाड होत आहे. दर वर्षी शासनाकडून वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्रत्येक कार्यालयाला देण्यात येते. परंतु बऱ्याच कार्यालयात केवळ फोटो पुरतेच वृक्षारोपण होते. दरवर्षी एकाच खड्यात थातुरमातुर वृक्षारोपण करून निधी हडप केला जातो. वृक्षरोपणाबरोबरच वृक्ष संवर्धन करणे आवश्यक आहे. परंतु असे होत नाही. या उलट प्रत्यक्षात झाडे लावण्याच्या प्रमाणात वाढ होण्यापेक्षा झाडे तोडण्याच्या प्रमाणातच वाढ जास्त होताना दिसते.
प्रत्येक जिल्ह्यात अशा वृक्ष संवर्धनासाठी कर्मचारीही नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यांच्या वेतनावर शासनाचा कोट्यावधींचा खर्च होतो. परंतु हा खर्च वाया गेल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांच्या दुर्लक्षामुळे वृक्ष तोडीचे प्रमाण वाढते आहे. कारण दरवर्षी कोट्यावधी झाडे लावल्याचा दावा केला जातो. परंतु त्यातील बरीचशी झाडे केवळ त्यांचे संवर्धन न झाल्यामुळे जळून जातात व पुन्हा त्याच खड्यात नवीन झाड लावले जाते. त्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी वनविभाग, नगर परिषद, शिक्षण विभाग, महसूल विभागासह सर्व विभागांनी जागृत होऊन वृक्षारोपण व त्याचे संवर्धन यासाठी लोकजागृतीसह पुढाकार घेणे आवश्यक आहे. वृक्षाची तोड व वाढते उष्णतामान यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर निश्चितच पुढील काळात पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यासाठी केवळ वृक्ष लागवडीची कोटीच्या कोटी उड्डाणे न मारता, प्रत्यक्षात कृती करणे आवश्यक आहे.































































