संतप्त शालेय विद्यार्थ्यांचे बस रोको आंदोलन

296

मेहकर वरून ग्रामीण भागात जाणारी बस रोज उशीरा येत असल्याने संतप्त शालेय विद्यार्थ्यांनी गुरुवारी रात्री सात ते पावणे आठ यादरम्यान बस रोको आंदोलन पुकारले. यावेळी विदर्यार्थ्यांनी मेहकर बसस्थानक मधून एकही बस सोडू दिली नाही. त्यानंतर मेहकर आगाराने विद्यार्थ्यायाठी विशेष बसची व्यवस्था केली. त्यानंतर विद्यार्थी आपल्या गावी गेले.

तालुक्यातील सर्वच ठिकाणाहून शालेय विद्यार्थी शिकण्यासाठी शाळेत येतात .शाळा सुटल्यानंतर हे विद्यार्थी घरी जाण्यासाठी बस स्टँड वर येतात मात्र घाटबोरी,द्रुगबोरी,उमरा,कळमेश्वर, सावत्रा,नायगाव मार्गावरील बसेस विलंबाने येतात. यामुळे गुरुवारी जवळपास ७० ते ८० विद्यार्थ्यांनी मेहकर बस स्टँड वरून एकही बस जाऊ न देण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान शिवसेना जि प गटनेते आशिष रहाटे व युवा सेनेचे सागर कडभणे तेथे पोहोचले. त्यांनी आगार व्यवस्थापक यांच्या कँबीन कडे जाऊन बघितले तर तेथे कोणीच जबाबदार अधिकारी हजर नव्हता. तेव्हा या मंडळींनी विभाग नियंत्रकांना याबाबत कळवले व तब्बल पाऊण तासाने या विद्यार्थ्यांसाठी बस सोडण्यात आली. यावेळी कामगार सेनेचे संजय मापारी यांनी सुध्दा प्रयत्न केले.तर पोलीस उपनिरीक्षक सागर पेंढारकर हे सुध्दा सहकाऱ्यांना घेऊन तेथे पोहोचले व बस सोडण्यासाठी प्रयत्न केला.

डिझेल अभावी बसेस लेट

डिझेल टँकरच मेहकर आगारात न आल्याने मेहकर आगाराच्या बसेस शुक्रवारीही एक ते दोन तास उशिराने धावल्या. तर काही बसच रद्द कराव्या लागल्या. याचा फटका प्रवाशांना बसल्याने त्यांनी सुध्दा संताप व्यक्त केला. रात्री उशिरा टँकर येणार असल्याचे आगार व्यवस्थापक रणवीर कोळपे यांनी सांगितले. एकंदरीत मेहकर आगाराचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या