शालेय सहलीत विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल

31

सामना ऑनलाईन । मुंबई

नालासोपाऱ्यातील नवजीवन शाळेतील दहावीत शिकणाऱ्या 16 वर्षाच्या मुलाचा शाळेच्या शैक्षणिक सहलीत  संशयास्पद मृत्यू झाला आहे. दीपक चंद्रकांत गुप्ता असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून नालासोपारा पूर्व प्रगती नगर येथील नवजीवन विद्यामंदिर शाळेत तो दहावीच्या वर्गात शिकत होता. शाळेची शैक्षणिक सहल ठाणे येथील सुरज वॉटर पार्क येथे गेली होती. पिकनिक सुरू असतानाच तो चक्कर येऊन खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

अचानक झालेल्या मृत्यूने 1000 हून अधिक संतप्त नागरिकांनी शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शाळेच्या बाहेर आक्रोश केला. या संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना शेवटी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. जमावाला पांगवून पोलिसांनी शाळा व्यवस्थापनावर नालासोपाऱ्यातील तुलिंज पोलीस ठाण्यात  निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

16 वर्षांचा दीपक चंद्रकांत गुप्ता, नालासोपारा पूर्व प्रगती नगर, ओसवाल नगरी येथील नवजीवन विद्यामंदिर शाळेत तो दहावीच्या वर्गात शिकत होता. काल शुक्रवारी नवजीवन शाळेची शैक्षणिक सहल ठाणे येथील सुरज वॉटर पार्क येथे गेली होती. या सहलीत शाळेचे जवळपास 200 हून अधिक मुलंही होते. वॉटर पार्क मध्ये सर्व मुलांची धमाल मस्ती सुरू असतानाच दीपक गुप्ता या मुलाला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. उपस्थित शिक्षकांनी तत्काळ त्याला जवळ्च्या रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही बातमी जेव्हा नालासोपाऱ्यात त्याच्या कुटुंब व नातेवाईकांना समजली तेव्हा मात्र शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात एकाच संतापाची लाट पसरली होती.

रात्री पासूनच शाळेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शाळेच्या आवारात त्यांनी आक्रोश सुरू केला होता. आज मृत मुलाचे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नालासोपाऱ्यात आणल्या नंतर पुन्हा हजाराच्या वर संतप्त नागरिकांनी हल्लाबोल केला. या नागरिकांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

परंतु शैक्षणिक सहली दरम्यान शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजी पणामुळे मुलाला जीव गमवावा लागल्याने शाळा व्यावस्थापणा विरोधात तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या